22 January 2025 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स

Senior IPS officer Rashmi Shukla

मुंबई, २७ एप्रिल | वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत.

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत.

रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले. उद्या म्हणजेच २८ एप्रिलला जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना सांगण्यात आले आहे. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीलाही गेले असल्याची माहिती माहिती आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

दरम्यान, एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. तसेच कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का? सिताराम कुंटे यांनी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होते. त्यांचे याबाबतच एक पत्रही उघडकीला आले. त्यानंतर त्यांनी आपली चूकही कबूल केली होती”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

News English Summary: Senior IPS officer Rashmi Shukla has been summoned in a phone tapping case. Maharashtra Police Cyber Cell has issued summons to Rashmi Shukla. Maharashtra cadre IPS officer Rashmi Shukla is currently on deputation to the Central Government.

News English Title: Senior IPS officer Rashmi Shukla has been summoned in a phone tapping case news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x