27 January 2025 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

अन्यथा अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोप येणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ

Senior NCP leader Hasan Mushrif, Gopichand Padalkar, Sharad Pawar

कोल्हापूर, २८ जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. गोपीचंद पडळकरांना आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. तसेच गोपीचंद पडळकरांच्या विधानामागे बोलवते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आहे, असा आरोप देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते.

 

News English Summary: Now senior NCP leader Hasan Mushrif has also targeted Gopichand Padalkar over his statement on Sharad Pawar. Minister Hasan Mushrif said, “I condemn the remarks made by BJP MLA Gopichand Padalkar about the country’s leader Sharad Pawar.

News English Title: Senior NCP leader Hasan Mushrif has also targeted Gopichand Padalkar over his statement on Sharad Pawar News latest Updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x