22 February 2025 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Sharad Pawar Alleges NCB | साक्षीदार आरोपींना पकडून घेऊन जातात म्हणजे शासकीय यंत्रणेत पक्षीय लोकांचा सहभाग - पवार

Sharad Pawar Alleges NCB

मुंबई, ०७ ऑक्टोबर | मुंबईतील क्रूझवर ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट आहे. असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील NCB च्या कारवाईवर काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला हळूहळू राजकीय वळण (Sharad Pawar Alleges NCB) लागत आहे.

Sharad Pawar Alleges NCB. How can witnesses have the right to arrest the accused? ‘ Sharad Pawar has asked such a direct question to NCB. Nawab Malik had asked a similar question yesterday :

आरोपींना पकडण्याचा अधिकार हा साक्षीदारांना कसा काय असू शकतो?’ असा थेट सवाल शरद पवार यांनी एनसीबीला विचारला आहे. कालही अशाच स्वरुपाचा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला होता. ज्यावर एनसीबीने एवढंच सांगितलं होतं की, ते सगळे स्वतंत्र साक्षीदार होते त्यामुळे त्यांना रेडमध्ये सामील करण्यात आलं होतं. मात्र आता याप्रकरणी पवारांनी पुन्हा एकदा बारामतीत पत्रकारांशी बोलताना अशाच स्वरुपाचा सवाल केला आहे.

शरद पवार ड्रग्स केसप्रकरणी काय म्हणाले:
मुंबईमध्ये एका बोटीवर ड्रग्स संदर्भात कारवाई करण्यात आली. मात्र, तेथे तथाकथित लोकांना पकडणारे काही लोक हे शासकीय यंत्रणेतील नव्हते. नंतर खुलासाही करण्यात आला की, ते शासकीय यंत्रणेतील नव्हते.‌ साक्षीदार म्हणून आम्ही त्यांना बोलावले होते. परंतु साक्षीदार बोलावणे ही एक वेगळी गोष्ट आहे किंवा पंचनामा करण्यासाठी असे लोकं बोलावतात हे स्वाभाविक आहे.

हे सुद्धा वाचा – Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १०% हुन अधिकची उसळी | गुंतवणूकदार मालामाल

‘परंतु आरोपींना पकडण्यासाठी साक्षीदारांना अधिकार कसा असू शकतो? हे लोक राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. याचा अर्थ ते जेव्हा तथाकथित आरोपींना पकडून घेऊन जातात, तेव्हा याचा अर्थ असा की, तुम्ही शासकीय यंत्रणेत पक्षीय लोकांचा सहभाग करून घेतलेला आहे. आणि हे सर्वात वाईट आहे.’ असं म्हणत पवारांनी NCB च्या तपासाबाबतच काही सवाल उपस्थित केले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sharad Pawar Alleges NCB over involvement of political party workers during raided.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x