21 November 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शरद पवारांची मोहिते-पाटील पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती

Sharad Pawar, big game, Mohite Patil father and son, BJP

पुणे, १३ ऑगस्ट : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या पिता-पुत्रांनी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांना त्यांचे जाणे जिव्हारी लागले होते. पण आता सत्तेत आल्यानंतर पवारांनी या पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती आखली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीसाठी पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

डाॅ.धवलसिंहांना विधानपरिषदेवर पाठवून एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. मोहिते पाटलांना संधी दिली तर सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळेल, असा आशावाद ही नेत्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर सोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. तेव्हा पासून जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे पक्ष नेतृत्वाची उणीव आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभेला ही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला. पक्षाला अधिक बळकट बनवण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या दृष्टीने तसे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये अकलूज येथील डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. राजकीय मैदानावर बॅटिंग करताना कोणता चेंडू कधी टाकायचा आणि फिरकी घ्यायची हे ते उत्तम जाणतात. ते जे बोलतात त्याविरुद्ध करतात. विधानसभा निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे भाजपने ऑपरेशन कमळद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेतले आणि पाच-दहा नेते सोडता अख्खी राष्ट्रवादी खाली झाली. तेच सूत्र आता शरद पवार आखत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच, आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल, असंही बोललं जात आहे.

 

News English Summary: After coming to power, Pawar has come up with a strategy to support these fathers and sons. Dr. Pawar, son of Maharashtra State Wrestling Council Vice President and former Minister Pratap Singh Mohite Patil, has been nominated for the post of Governor. Dhawal Singh Mohite Patil’s name is likely to be sealed.

News English Title: Sharad Pawar big game to give to Mohite Patil father and son who joined BJP News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x