22 December 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात राज्य सरकारला मर्यादा | केंद्रानंही सहकार्य करावं

Sharad Pawar, Osmanabad Tour, Rain Lash Crop, Maharashtra Farmer

उस्मानाबाद, १८ ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार यांनी सकाळी तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण जमीनच खरवडून गेल्याचे अनेक ठिकाणी दिसले. हे नुकसान एका दिवसात भरुन येणारे नाही. मात्र, मदतीसाठी राज्य सरकारला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्रानेही मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारकडे शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. परंतु, नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता एकटे राज्य सरकार पुरणार नाही. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन याविषयी चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खा. ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले उपस्थित होते.

 

News English Summary: The rains in the state caused a huge famine. Crops were severely damaged due to heavy rains in many parts of the state. Many crops were swept away in the floods, and crops in the fields were destroyed. NCP president Sharad Pawar is on a tour of Osmanabad district today to inspect the damage caused by the monsoon. Pawar inspected the damage in Tuljapur-Paranda taluka this morning.

News English Title: Sharad Pawar On Osmanabad Tour Rain Lash Crop In Many Parts Of Maharashtra Farmer In Distress Situation News Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x