22 January 2025 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Sharad Pawar Press Conference | फरार साक्षीदार आणि NCB अधिकाऱ्यांवर आरोप होताच प्रथम भाजपाचे नेते खुलासा करतात

Sharad Pawar Press Conference

मुंबई, १३ ऑक्टोबर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेंकडून सुरु (Sharad Pawar Press Conference) असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या देशातील विविध घटनांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

Sharad Pawar Press Conference, The NCB has arrested some people in the Mumbai cruise operation. Wherever a crime is committed, the police or the central authorities first conduct a Panchnama. There was writing in front of the Pancha. But he us wanted said Pawar :

अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. मला कौतुक वाटतं त्या एजन्सीचं. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा”, अशा शब्दात पवारांनी निशाणा साधला.

NCB वर वक्तव्य:
काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची खबरदारी घेतली जात आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी काही माहिती दिली. यंदा मला ५४ वर्ष विधिमंडळात होतात. राज्यात किंवा केंद्रात काम करायला २६ वर्ष पूर्ण होतात. आम्ही नेहमीच प्रशासनाशी संबंध चांगले ठेवलेत.

मुंबई क्रूजवरील कारवाईत एनसीबीने काही लोक पकडले आहेत. कुठेही गुन्हा वगैरे घडला, तर पोलीस किंवा केंद्रीय यंत्रण आधी पंचनामा करतात. पंचांच्या समोर लिखापढी होते. अधिकारी करत असलेली कारवाई योग्य आहे याची खात्री वाटावी अशा पद्धतीचे हे पंच असायला हवेत. पण जे कोण गोसावी होते, ते गेले काही दिवस फरार आहेत का काय माहिती नाही. पंच म्हणून ज्यांची निवड केली असेल, ती व्यक्ती समोर यायला तयार नाही, याचा अर्थ त्यांची नैतिकता संशयास्पद दिसत आहे. पण ज्या नार्कोटिक्स एजन्सीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची निवड केली, याचा अर्थ या अधिकाऱ्यांचे संबंध कोणत्या प्रकारच्या लोकांशी आहे, हे त्यातून स्पष्ट होत आहे.

अशा प्रकारात आरोप केल्यानंतर त्यावर खुलासा करण्यासाठी सगळ्यात आधी भाजपाचे नेते होते. मला कळेना की ही जबाबदारी, हे काँट्रॅक्ट भाजपाच्या नेत्यांनी कधी घेतली. त्यात नुसतेच ते येतात असं नाही. एका ठिकाणी छापे टाकले, त्याबाबत एक विधान एका केंद्रीय राज्यमंत्र्याचं होतं की हे आमचंच काम आहे. मला माहिती नव्हतं.. सरकारमध्ये काम केलं आहे मी. पण हे आमचंच काम असतं ही आमच्या ज्ञानात त्यांनी भर टाकली. ते मला कुठे भेटले, तर जाहीरपणे आभार मानेन त्यांचे. पण मुद्दा हा आहे की शासकीय यंत्रणेकडून सत्तेचा गैरवापर होत असेल, तर त्याचं समर्थन करताना भाजपाचे लोक दिसतायत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sharad Pawar Press Conference made serious allegations on NCB BJP connections.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x