21 April 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER
x

पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते - शरयू देशमुख

Sharyu Deshmukh

मुंबई, २९ जून | देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वक्तव्यावरून थोरातांना टोला लगावला आहे.

महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे , याचेही भान यांना राहिले नाही , ” असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांना ट्विटर अकाऊंटवरुन निशाणा लगावला होता . त्यानंतर , मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि अमृतवाहिनी कृषी शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमख यांनी पडळकर यांना संस्कारी भाषेत टोला लगावला.

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांना पडळकर यांची भाषा न रुचल्याने पडळकर यांना संस्काराची भाषा शिकवली. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत . आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती . असो , ज्याचे त्याचे संस्कार .. ! , असे ट्विट शरयू देशमुख यांनी केलं आहे . गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वडिलांवर केलेली टीका शरयु देशमुखांना सहन न झाल्याने पडळकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येने संस्कारी भाषेत टोला लगावलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Sharyu Deshmukh slams BJP MLA Gopichand Padalkar over statement of minister Balasaheb Thorat news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या