15 January 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

शिंदे पुत्राच्या बचावासाठी शिंदे गटातील नेत्यांकडून 'स्क्रिप्टेड खोटा प्रचार' सुरु | सुप्रिया सुळेंचा फोटो एडिट करून बदनामीचा केविलवाणी प्रयत्न

Sheetal Mhatre

MP Supriya Sule ​​| खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत असा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता आणि श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक ट्विटही केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो ट्विट केला.

शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातला फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतं आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावर ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न विचारत शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केला आहे.

सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो हा मॉर्फ केल्याचं समोर आलं आहे. तसे दोन वेगवेगळे फोटोही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेत. फोटोत छेडछाड करुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सुप्रिया सुळे बसल्याचं भासवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलाय. गोव्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत याबाबतचा दावा केलाय.

ओरिजनल फोटो :
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनीही याच फोटो संदर्भात ट्विट करत ओरिजनल फोटो काय आहे आणि त्याचं मॉर्फिंग कसं केलं गेलं आहे ते ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर शिंदे गटावर टीकाही केली आहे. वाण नाही पण गुण लागला,शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे. हा घ्या पुरावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sheetal Mhatre shared MP Supriya Sule’s morphed photo check details 24 September 2022.

हॅशटॅग्स

#Sheetal Mhatre(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x