22 November 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

VIDEO | पोलखोल, शिंदे गट धनशक्तीच्या गर्दीतून लोकांवर नेतृत्व लादतोय?, आपण कुठे, कशासाठी जातं आहोत हेच महिला-मुलींना माहिती नाही

Shinde Camp

CM Eknath Shinde | शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता शिवसेनाही काबीज करतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच यंदा पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. पहिला मेळावा आहे तो उद्धव ठाकरेंचा जो शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे. तर दुसरा मेळावा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. जो बीकेसी मैदानावर होणार आहे. एकाबाजूला निष्ठावान शिवसैनिक खिशातून पैसे टाकून येत आहेत आणि अशात फ्लोरिडामधला एक कट्टर शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित झाला आहे. ८० हजारांचं तिकिट काढून अक्षय राणे मुंबईत आला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या १८०० बसेस बूक करण्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. दसरा मेळाव्याच्या माहिती देताना दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची नसते, ती आपोआप होत असते. जो जो महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे असंख्य लोक मेळाव्याला येऊ इच्छित आहेत.

मात्र अर्थशक्तीतून शिंदे स्वतःची प्रतिमा लोकनेता अशी करत असल्याचं आत्तापासूनच उघड होऊ लागलं आहे. सध्या शिंदेंच्या मेळाव्याला राज्यातील विविध पट्ट्यातून शिंदे समर्थक लोकांना घेऊन येतं आहेत. या पदाधिकाऱ्यांना धनशक्ती पुरविण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे लोकांना मुंबईत येण्यासाठी आर्थिक आमिष दाखवली जातं आहेत या विरोधकांच्या आरोपांना अखेर ऑन कॅमेरा पुरावे मिळत आहेत. गाव खेड्यातून काही महिलांच्या मागे धनशक्ती पुरवून महिलांना आणण्याचं टार्गेट दिलं आहे. अशा महिलांना आणि मुलींना ट्रेन मार्गे मुंबई आणण्यास सुरुवात झाली आहे. यावर ‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीने थेट ट्रेनमधून येणाऱ्या महिलांशी संवाद साधला. अनेक महिला आणि मुलींना बीकेसीत घेऊन येण्याच टार्गेट दिलं आहे.

महागाईत गरिबांना किती दोष द्यावा, पण गाव खेड्यातील याच गरिबीचा फायदा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतो आहे. कारण ‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधींनी जेव्हा या महिला आणि मुलींना विचारलं तुम्ही कुठे जातं आहात आणि कोणाचं भाषण ऐकणार आहेत, तसेच मुख्यमंत्री कोण आहेत अशा प्रश्नांची उत्तरच माहिती नव्हती. काही महिला आणि मुलींना प्रश्न विचारताना इतर महिला इशारे करताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे सरकार धनशक्तीच्या जीवावर स्वतःच नेतृत्व लोकांवर जबरदस्ती लाडात असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, यातून शिंदेंच्या यापूर्वीच्या दौऱ्यात अर्थशक्तीवर कसे इव्हेन्ट घडवले असणार याचा देखील अंदाज येऊ लागला आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp fake supporter crowed exposed check details 04 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x