बुलढाणा | शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न | मतदारसंघात खळबळ
बुलढाणा, २६ मे | कोरोना आपत्तीत निरनिराळी वक्तव्य करून चर्चेत आलेले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी घरासमोर जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे. ही घटना घडली तेव्हा आमदार संजय गायकवाड हे घरी नव्हते. कामानिमिताने संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रकाराने खळबळ माजली आहे
माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. तसंच, राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
News English Summary: Shiv Sena MLA Sanjay Gaikwad’s car was set on fire in front of his house after he made various statements in the Corona disaster. An attempt has been made to set fire to his 4 wheeler in front of his house. The incident has caused a stir in Buldana. Meanwhile, Sanjay Gaikwad has made a serious allegation that it was a pre-planned cut.
News English Title: Shiv Sena MLA Sanjay Gaikwad’s car was set on fire in front of his house at Buldhana news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News