10 January 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा Srestha Finvest Share Price | 75 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, जोरदार खरेदी, अप्पर सर्किट हिट करतोय - Penny Stocks List IREDA Share Price | पीएसयू IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: IREDA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा - IPO Watch Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
x

पुण्यात मराठा आरक्षणावरून बैठक | उदयनराजे, शिवेंद्रराजेंची बैठकीला अनुपस्थिती

Shivsangram Leader Vinayak Mete, MP Udayanraje Bhonsale, Maratha reservation, Maratha Kranti Morcha

पुणे, ३ ऑक्टोबर : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनाही वैयक्तिक आमंत्रण दिल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. पण या नेत्यांपैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

नाशिक इथल्या छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीमधल्या राज्यस्तरीय मराठा समन्वयकांच्या बैठकीला विनायक मेटे उपस्थित राहिले नव्हते. ही बैठक त्यांची वैयक्तिक बैठक आहे असं सांगून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील या बैठकीला उपस्थित नव्हते.

या बैठकीमध्ये 25 ठराव मंजूर केले गेले. शासनाने 1 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व समाज रस्त्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसंच मराठा आरक्षणावरचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याचा ठरावही या बैठकीमध्ये पारित करण्यात आला.

दयनराजेंच्या अनुपस्थितीवर बोलताना विनायक मेटे म्हणाले की, “मेटे- उदयनराजेंना मी स्वत: आमंत्रण दिलं होतं. आज ते का आले नाहीत माहीती नाही. पण काही तातडीचं काम आलं किंवा आणलं गेलं माहिती नाही. पण पुढच्या आठवड्यात साताऱ्याला सगळ्या महत्त्वाच्या मराठा नेत्यांची मी बैठक आयोजित करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं.”

 

News English Summary: On the initiative of Vinayak Mete, the head of Shiv Sangram Sanghatana, a meeting was held in Pune today to discuss the Maratha reservation. The Maratha Vichar Manthan meeting was organized to bring harmony on the issue of reservation of the Maratha community and other issues of the community. Various leaders of the Maratha reservation movement were invited for this meeting. Vinayak Mete said that Udayan Raje and Shivendra Raje were also personally invited. But none of these leaders attended the meeting.

News English Title: Shivsangram Leader Vinayak Mete reaction on Udayanraje absent in Maratha reservation meeting in Pune Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x