22 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

केंद्राच्या बचावासाठी मेटेंचं धक्कादायक विधान | म्हणाले, 50 टक्क्यांच्या आतच मराठा समाजाला आरक्षण देता येईल

Maratha reservation

मुंबई, १२ ऑगस्ट | केंद्रातील मोदी सरकारने 102 वी घटना दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता संभ्रम दूर झाला आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कायद्यामुळे आता राज्यांना अधिकार असणार आहेत. ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं सांगतानाच ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी, असं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे.

विनायक मेटे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हे आवाहन केलं आहे. मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. राज्य मागासवर्गीय आयोगात जे जातीय लोक आहेत त्यांना हटवावे. नाही तर जातीय अन्याय होऊ शकतो. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगात सर्व जातीच्या सदस्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

50 टक्के मर्यादा आजची नाही:
आरक्षणाला 50% ची मर्यादा ही आजची नाही. 50% च्या आतही मराठा समाजाला आरक्षण देता येईल. आयोगामार्फत सर्व्हे करत मार्ग काढता येईल. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तर करावी, असं सांगतानाच नाकर्तेचे नाव म्हणजे अशोक चव्हाण आहे. सरकारची मानसिकता लोकांना सामोरे जाण्याची नाही, असंही ते म्हणाले.

घटतानातज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?
“पक्षीय राजकारणात न जाता फक्त राज्य घटनेत काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करुन सांगतो, ३ वर्षांपूर्वी 102 वी घटना दुरुस्ती केली त्यात 338 ब 342 अ अशी अशी कलमं घातली गेली. त्यानुसार नॅशनल कमिशन फॉर बॅकवॉर्ड तयार झालं. त्यानुसार राष्ट्रपती संबंधित वर्गाला बॅकवर्ड ठरवतील, राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतील, यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला असेल.

थोडक्यात राज्याचे सगळे अधिकार 102 व्या घटनादुरुस्तीने केंद्राकडे गेले होते. त्यावेळी भाजपचे सरकार होतं, त्यांनाही यातलं काही कळलं नाही. मोदी 2.0 सरकारलाही यातलं काही कळलं नाही. मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्यावेळी स्वच्छ शब्दात कोर्टाने सांगितलं की आरक्षणाचा अधिकार केंद्राकडे आहे आणि 50 टक्क्याच्यावरती आरक्षण देता येणार नाही म्हणून मराठा आरक्षण त्यांनी रद्द केलं असं घटनातज्ञ गिरीश बापट म्हणाले.

50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या उपसूचनेवर भाजपने दुरुस्तीविरोधात मतदान केलं:
102व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना आम्ही आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची सूचना केली. या उपसूचनेवर संसदेत मतदान झालं. त्याला काँग्रेससहीत इतर खासदारांनी पाठिंबा दिला. पण भारतीय जनता पक्षाने या दुरुस्तीविरोधात मतदान केलं. रावसाहेब दानवे यांनी तर तोंडही उघडलं नाही. त्यामुळे भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षण विरोधी असल्याचं उघड झालं आहे, असा घणाघाती हल्ला विरोधकांनी केला.

संभाजीराजेंनी देखील प्रश्न उपस्थित केला:
राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे मराठा आरक्षणाच्या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल असल्याचं मत भाजपाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी ५० टक्के आरक्षणाच्या मार्यादेसंदर्भात भाष्य करताना ५० टक्क्यांची मर्यादा उठवल्याशिवाय महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsangram leader Vinayak Mete talked on Maratha reservation under 50 percent news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x