5 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

फडणवीसांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार: चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar

मुंबई: राज्यात जनतेने भारतीय जनता पक्ष -शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं लवकरच सरकार स्थापन होणार आहे, असं सांगतानाच सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केलं.

महायुतीचं सरकार स्थापन करण्याबाबत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील चर्चा बंद आहे. दोन्ही पक्षातील नेते प्रसारमाध्यमातून वेगवेगळे दावे करत आहे. भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यास शिवसेना सत्ता स्थापन करेल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

यावेळी महायुतीच्या चर्चेसंदर्भातील चेंडूही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलावला. ”राज्यात महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्या जनादेशाच आदर करून आम्ही सरकार स्थापन करू. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. आता ते लवकरात लवकर प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसाठी भारतीय जनता पक्षाची दारे २४ तास खुली आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू,”असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x