स्वबळावर की मिळेल त्यात समाधान मानायचं? शिवसेनेचं काहीच ठरेना: सविस्तर
मुंबई : विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते. शिवसेनेला १२० जागा देऊ पाहणाऱ्या भाजपचे गाडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने कमी जागा घेऊन युती करायची की कसे याबाबत शिवसेनेच्या आमदार, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशीच शिवसेना नेतृत्व संपर्क साधणार असल्याचे कळते.
निम्म्या जागांच्या प्रस्तावानुसार शिवसेनेच्या वाट्याला १४४ जागा येणार होत्या. त्यातील नऊ जागा शिवसेनेने मित्रपक्षांना सोडाव्यात असा सुरुवातीला भाजपचा आग्रह होता. मात्र मित्रपक्षांची साथ भाजपला असल्याने आपण कशाला जागा सोडायच्या अशी भूमिका शिवसेना नेतृत्वाने घेतली होती. मात्र नंतर त्यांनी १४४ मधील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आता शिवेनेच्या वाट्याला १३५ जागा याव्यात असे शिवसेना नेतृत्वाचे म्हणणे होते. मात्र भाजपकडून या जागांसाठी अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. उलटपक्षी शिवसेनेला जवळपास १२० जागा देण्याची तयारी असल्याचे प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला पाठविले जात आहेत.
साधारण १० जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं आहे. त्यामुळे आज शिवसेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे. शिवसेना ११५ -१२५ आणि भाजप १७३ -१६३ अशा आकडेवारी दरम्यान एकमत होण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून काल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी ताठर भूमिका कायम ठेवल्याने जागावाटपाला अंतिम स्वरूप देणे अशक्य झाले.
त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेली जागावाटपाची बोलणी अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा रखडली आहेत. अर्थात नेमक्या कोणत्या जागांबाबत चर्चा पूर्ण होऊ शकलं नाही हे सुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही. तेव्हा आता बघूयात विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना भाजपमधील जागावाटप कधी पूर्ण होत युती जाहीर केली जाते. रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत होते. पण यावेळी मात्र ते मातोश्रीवर गेले नाहीत. त्यामुळे आता युतीची भाजपला अधिक गरज नसल्य़ाची चर्चा होती. युतीबाबत आतापर्यंत अनेक फॉर्म्युले समोर आले आहेत.
नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत फैसला होणार आहे. परंतु, युती झाली किंवा नाही झाली तरी ठाण्यातील नेत्यांनी गेल्या नऊ महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे, त्या ठिकाणी शिवसेनेतील संभाव्य उमेदवारांची निश्चिती झाली आहे.
भाजपवर कुरघोडी करण्यासाठी ठाण्यात शिवसेना सिद्ध आहे. युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्याच सर्वेक्षणातून उघड झाली आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाची तयारी तर दुसरीकडे विद्यमान आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा