11 January 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

टीकेची पातळी घसरली; हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर अश्लिल भाषेत टीका

Abdul Sattar, MLA harshvardhan jadhav

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

हर्षवर्धन जाधव यांची शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लील भाषेत टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भारतीय जनता पक्षाकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे.

एका प्रचार सभेत बोलत असताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, “हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचं भाषण आहे. दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडं. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केलं हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रफिक पोलिसला फोन करू शकतो की नाही, हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. आहो तुम्ही येडे झाले का, त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले. हे शिवसेनेच भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना विचारतो. एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडं आहे, तर सत्तार तुमचा कोण लागतो? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे, चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है…,” अशी पातळी सोडत हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांचं हे भाषण समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहे.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x