19 April 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आमचे मार्गदर्शक | फडणवीस यांचं ट्विट

Shivsena, Balasaheb Thackeray Jayanti, Devendra Fadnavis

मुंबई, २३ जानेवारी: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत.

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.

दरम्यान, हिंदुत्व आणि शुद्ध भगवा या मुद्द्यांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’, असा केला आहे. त्यामुळे आता भगव्यापाठोपाठ आता भारतीय जनता पक्ष बाळासाहेबांच्या वारश्यावरही आपला हक्क सांगणार का, अशी शंका उत्पन्न झाली आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis’s tweet on the occasion of Shiv Sena chief Balasaheb Thackeray’s birthday is now a topic of discussion. In this tweet, Fadnavis has referred to Balasaheb Thackeray as ‘our guide’. Therefore, after saffron, there is a doubt whether the Bharatiya Janata Party will now claim Balasaheb’s legacy.

News English Title: Shivsena founder Balasaheb Thackeray Jayanti Devendra Fadnavis criticised to Shivsena Uddhav Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या