6 November 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पुन्हा असभ्य भाषा; काय म्हणाले नेमकं?

Shivsena, Minister Gulabrao Patil

जळगाव: शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. ‘सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन. भोगावे लागले इथेच’, असे वक्तव्य त्यांनी केले.

युतीच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीवेळी आमची भारतीय जनता पक्षासोबत युती होती. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी आम्ही अंग झटकून मेहनत केली. रात्रीचा दिवस केला. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने युती धर्माचे पालन केले नाही. आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात बंडखोर पेरले. सालेहो सेटींग करता, तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. माझ्या मतदारसंघात एनसीपीचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही”, असे गुलाबराव पाटील उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वापरलेला शब्द गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर टीका करताना वापरला. भडगाव इथे एक छोटेखानी राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर मत मांडले.

यापूर्वी देखील त्यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.

‘राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचे सरनेम, यांच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचे वलय त्यांच्याकडे दिसत आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

गुलाबराव यांनी त्यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली होती. ‘भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही?’, असा सवाल गुलाबरावांनी यावेळी उपस्थित केला होता. भारतीय जनता पक्ष निवडणुकीत फक्त पैशाचा वापर करते बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही, असा आरोपही मंत्री गुलाबराव यांनी केला होता. नाशिकमधील प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्लाबोल केला होता.

 

Web Title:  Shivsena Leader and Minister Gulabrao Patil again use objectionable word.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x