29 January 2025 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

तुमचे तीनच वर्षे उरलेत | तुम्ही बसलात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील - गुलाबराव पाटील

Shivsena Leader Gulabrao Patil, Modi Government, Farmers protest, New agriculture law

नवी दिल्ली, ६ डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यावर काँग्रेसनं आज अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमचे तीनच वर्षे उरले आहेत. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील”, असा असा इशारा गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारला दिला. आज (रविवार) जळगावात दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार शरसंधान साधलं.

“शेतकरी या देशाचा कणा आहे. जर शेतकरी जगला तरच हा देश जगेल. भारत देश केवळ कृषीप्रधान आहे असं म्हणून चालणार नाही तर त्यासाठी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे लागतील. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी राजाने दिल्लीतल्या सीमेवर ऐन थंडीत तळ ठोकलाय. मात्र सरकार त्यांच्या भावना समजून घेत नाही हे निराशाजनक आहे”, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, “8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

 

News English Summary: Shiv Sena leader and minister Gulabrao Patil has sharply criticized the Bharatiya Janata Party. Gulabrao Patil aimed at the central government, saying that the farmers will change the board on which you are sitting. “Do not do injustice to the farmers. Otherwise Delhi is not far away. You only have three years left. Farmers will change the board on which you are sitting, ”Gulabrao Patil warned the Central Government. Asked about the reaction to the farmers’ agitation in Delhi in Jalgaon today (Sunday), he slammed the Bharatiya Janata Party.

News English Title: Shivsena Leader Gulabrao Patil criticized Modi Government over Farmers protest against new agriculture law news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x