22 November 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

स्वपक्षीय आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून बनाव, गुलाबराव पाटील बरसले

Shivsena, leader Gulabrao Patil, BJP MLAs, Devendra Fadnavis, SSR suicide case

जळगाव, 15 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी या प्रकरणात योग्य तपास करण्यात येत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तसंच याच मुद्द्यावरून ठाकरे सरकार अडचणीत येईल, असाही दावा कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे.

‘सुशांत आत्महत्या प्रकरणी सरकार पडेल हा भाजपाचा दावा म्हणजे आपले आमदार वाचवण्यासाठी केलेला बनाव आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत,’ असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या भाजपच्या आरोपांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात गैर काहीही नाही. मागे पाच वर्षे त्यांचेही सरकार होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो. तेव्हाही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तेव्हा तर एकाच महिन्यात दोन-दोन, तीन-तीन बदल्या झालेल्या मी पाहिल्या आहेत. जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी. त्यात किती गैरप्रकार झाले आहेत, ते लक्षात येईल ना? मात्र, चंद्रकांत पाटील हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंत्री होते. त्यांनी केलेला हा आरोप म्हणजे सरकारला तसेच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

 

News English Summary: The BJP’s claim that the government will fall in Sushant’s suicide case is a ploy to save its MLAs. NCP and we have no differences on this issue, ‘Gulabrao Patil has claimed.

News English Title: Shivsena leader Gulabrao Patil hits back to BJP Devendra Fadanvis on SSR suicide case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GulabraoPatil(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x