नाशिकमध्ये भाजपाला मोठं खिंडार पडणार | शिवसेना धक्का देण्याचा तयारीत
मुंबई, २३ डिसेंबर: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यांना प्रवेश दिला. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या विरोधापेक्षा पक्षातील विरोध आमदार सानप यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. सानप यांच्याविरुद्ध पक्षातील इच्छुकांचा एक मोठा गट त्यावेळी सक्रीय झाला होता, त्यांच्याकडून सानप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला होता. विशेष म्हणजे सानप यांना उमेदवारी देऊ नयेत म्हणून पक्षातील काही नेत्यांनी गिरीश महाजन यांची त्यावेळी भेट घेतली होती.
दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचं मोठं विधान शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलं आहे. बुधवारी शिवसेनेमध्ये असलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावर शिवसेनेकडून चांगलीच टीका करण्यात आली आहे. काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’ आहे. भारतीय जनता पक्षाचे बडे नेते अभी ‘बाकी’ आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. (Shivsena leader Sudhakar Badgujar statement over BJP big leaders coming soon in ShivSena at Nashik)
भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेत मोठं इनकमिंग होणार असल्याचं विधान बडगुजर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था बिकट होणार असल्याचंही सुधाकर बडगुजर म्हणाले. त्यामुळे खरंच जर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला खिंडार पडलं तर हा आगामी निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा धक्का असणार आहे.
News English Summary: The political atmosphere is heating up against the backdrop of the forthcoming elections. Shiv Sena leader Sudhakar Badgujar has made a big statement that there will be strong incoming in Shiv Sena now. Balasaheb Sanap, who was in the Shiv Sena on Wednesday, left the party and joined the Bharatiya Janata Party. This has been well criticized by Shiv Sena. The entry that took place yesterday is just a ‘Zanki’. The big leader of the Bharatiya Janata Party is still ‘left’, in such words Sudhakar Badgujar has made a suggestive statement about Shiv Sena incoming.
News English Title: Shivsena leader Sudhakar Badgujar statement over BJP big leaders coming soon in ShivSena at Nashik news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News