29 January 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

गोपीचंद पडळकर बांडगुळ, अशी बांडगुळं वाढत आहेत - आ. मनिषा कायंदे

MLA Gopichand Padalkar

मुंबई, २७ जून | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरक्षणाच्या विषयावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या वादात आता भाजपचे गोपीचंद पडळकरांनी उडी घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर विखारी शब्दात टीका केली आहे. यासोबतच त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाल संजय राऊतच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करत पडळकरांनी ही टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत बिनबुडाचा लोटा आहेत. संजय राऊत शिवसेनेचं खातात, मात्र पवारांसाठी जागतात. त्यामुळे अशा संजय राऊतांची धनगर समाजाला आवश्यकता नाही. असे म्हणत गंभीर शब्दात पडळकरांनी राऊतांवर टीका केली.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केलीय. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केलीय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: ShivSena MLA Manisha Kayande criticizes BJP MLA Gopichand Padalkar after his statement against MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x