19 April 2025 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

मराठा आरक्षणाच्याविरोधात 'वन मेरिट वन नेशन' या संस्थेला भाजपने रसद पुरवली - अरविंद सावंत

Maratha reservation

मुंबई, २९ मे |  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास एक वर्ष प्रयत्न करुनही संभाजीराजे छत्रपती यांना भेट दिली नाही. संभाजीराजेंची ही अवहेलना भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येणार आहे, असा थेट इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडूनच रसद पुरवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला. ‘वन मेरिट, वन नेशन’, ही संस्था मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. या संस्थेचे सर्व प्रमुख हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात वकील नेमून लढा दिला. त्यामुळे लोकांनी आता खरा शत्रू कोण आहे, हे ओळखावं, असे म्हटले.

मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व हुकूमाचे पत्ते पंतप्रधान मोदी यांच्याकडेच आहेत, हे संजय राऊतांचं वक्तव्य अगदी योग्य आहे. लोकसभेतही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा हा घटनादुरुस्तीचा मुद्दा आहे, हे मी सांगितलं होतं. परंतु, केंद्र सरकार जाणीपूर्वक घटनादुरुस्ती करणे टाळत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले.

तत्पूर्वी, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भारतीय जनता पक्षाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला होता. सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली होती. “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा संतप्त सवाल सावंत यांनी केला होता.

 

News English Summary: He made a serious allegation that the Bharatiya Janata Party was providing logistics against the Maratha reservation. ‘One Merit, One Nation’, this organization is against Maratha reservation. All the heads of this organization are office bearers of the Bharatiya Janata Party. This organization fought against the Maratha reservation by appointing a lawyer in the court. So people should now identify who the real enemy is, he said.

News English Title: Shivsena MP Arvind Sawant allegations on BJP over anti Maratha Reservation plea in court news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या