16 April 2025 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं | शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया

Navi Mumbai International Airport

मुंबई, २१ जून | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या नावाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली. ‘नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचेच तेएक्स्टेंशन आहे, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असेल,’ असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावरून आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. नवी मुंबईचे विमानतळ हे मुंबईतील विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा राज ठाकरे यांचा केवळ तर्क आहे. हे विमानतळ खरं तर नवीन असल्याचा दावा सावंत यांनी केलाय.

राज ठाकरे यांचा हा केवळ तर्क आहे. नवी मुंबईचं विमानतळ खरं तर नवीन आहे. हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा मतितार्थ त्यांनी काढला, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांना किती आदर आहे हे समोर आलं. हे खेदजनक असून, वाईट वाटत असल्याचं सावंत यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Shivsena MP Arvind Sawant criticizes Raj Thackeray stance on renaming Navi Mumbai International Airport news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या