महाराष्ट्रात जर बाळासाहेबांचे आशीर्वाद नसते तर दुर्बीण घेऊन भाजप पक्षाला शोधावं लागलं असतं
मुंबई, ०४ मे | सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधलाय. अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असं शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राजू शेट्टी यांनी एक व्हिडीओ केला. त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. त्यांनी त्याचा उल्लेख SS असा केला, हे SS म्हणजे शिवसेना समजले. पूनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम कसं करणार? शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. शिवसेनेनं धमकी दिलेली नाही.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं यांना धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच दिला होता, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, अशी खोचक टीकाही सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
तसेच, कोरोनासंदर्भात केंद्र सरकारचे वाभाडे जगभरात निघत आहेत. उरलेसुरले कालच्या निवडणूक निकालात गेले आहेत. देशात क्रांती घडत आहे. महाराष्ट्राने क्रांती घडवण्याला सुरुवात केली. गुडघ्याला बाशिंग बांधू नये. पंढरपूरच्या निकालानंतर राज्य सरकारवर संक्रमण येणार असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही मोठ्या राज्यात तुमचा पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने पहिला राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर आमच्या सरकारवर बोला असंही अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला बजावलं आहे.
News English Summary: Shiv Sena and Bharatiya Janata Party (BJP) are in a frenzy over the threat made to Adar Poonawala of Serum Institute. As a result, Shiv Sena MP Arvind Sawant has strongly targeted the Bharatiya Janata Party. We have great respect for Adar Poonawala. They work to save human lives in Maharashtra. We respect that. Even though Shiv Sena is an aggressive organization, we do not use this language, Arvind Sawant has responded to the allegations against Shiv Sena.
News English Title: Shivsena MP Arvind Sawant reply to BJP over politics in Maharashtra news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो