22 January 2025 6:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC
x

एकाही सदस्याच्या केसालाही धक्का लागला तर शिवसेनेशी गाठ: शिवसेना खा. धैर्यशील माने

Maharashtra Karnataka Issue, Karnatak Navnirman Sena leader Bhimashankar Patil

हातकणंगले : मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वाचाळ भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त विधानाला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी गुरूवारी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सीमाभागात संतप्त पडसाद उमटत आहेत.

‘गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ” असा इशारा धैर्यशील माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी;

 

Web Title:  Shivsena MP Dhairyashil Mane slams Karnatak Navnirman Sena leader Bhimashankar Patil over Maharashtra Karnataka Issue.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x