22 December 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्री असताना मोठा भ्रष्टाचार केल्याने त्यांना तिकीटच दिलं नाही - प्रतापराव जाधव

Shivsena MP Prataprao Jadhav

बुलढाणा, २४ जून | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी थेट शिवसेनेला संपविण्यावर भाष्य केलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खामगावमध्ये बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असल्याचा घणाघात बावनकुळेंनी केला होता. त्याला जोरदार प्रतिउत्तर देताना बावनकुळे यांनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीटच दिलं नाही, असा टोला शिवेसना खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावलाय.

चंद्रशेखर बावनकुळे हे आता शिवसेनाविरोधात गरळ ओकून पक्षात आपलं महत्व वाढवण्याचा आटापिटा करत आहेत. मात्र बावनकुळेंनी सत्तेत असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांचं तिकीटच कापलं, अशी टीका जाधव यांनी बावनकुळेंवर केलीय. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला हा बावनकुळेंचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कारण निवडणुकीपूर्वी समान जागांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले नव्हते. तर अमित शाह स्वत: मातोश्रीवर आले होते. असं असताना भाजपनं शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उभे केले. खतं तर भाजपनंच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा पलटवार जाधव यांनी केलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Shivsena MP Prataprao Jadhav criticizes BJP leader Chandrasekhar Bavankule news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x