22 December 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा
x

बेळगाव प्रकरणी फडणवीसांच्या पाठिंब्याची गरज होती | पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली - राऊत

Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, १६ एप्रिल: राज्यात एकीकडे कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीची एकीकडे तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शुभम शेळके या उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावर आणि भाजपलाही सुनावले आहे.

संजय राऊत म्हणाले की, “बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता, महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे आणि एकीकरण समितिचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. इथे मतभेद असले तरी चालतील मात्र तिथे नसायला हवेत. शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादी प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे, तिथे लोकांचा उत्स्फर्तपणे पाठिंबा मिळतोय, यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार चांगली मुसंडी मारतील”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

पुढे माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणं महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही, मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वातच विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. पाठिंब्याची गरज होती, त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या. आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल, तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे,’ असं राऊत म्हणाले.

 

News English Summary: It is the duty of every party in Maharashtra to support the Maharashtra Unification Committee in the border areas. I did not feel bad when Devendra Fadnavis criticised me, but he was a former Chief Minister of Maharashtra. Under his leadership, a resolution has been passed in the assembly to support Belgaum-Karwar. He took a different role at a time when support was needed.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut criticised Devendra Fadnavis over stand against Belgaum issue news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x