शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक - संजय राऊत
मुंबई, २८ जानेवारी: दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सर्वच स्तरांतून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचाही मृत्यू झाल्यानं राज्यातही खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरकारनं एक प्रकारची दडपशाही सुरू केली आहे. लाल किल्ल्यावर जे शेतकरी घुसले, असं म्हणतायत. ते खरोखर शेतकरी होते का असा प्रश्न निर्माण होतोय. लाल किल्यावर शेतकरी नव्हते फूस लावून काही जणांना पाठवण्यात आले होते. ते आता कुठे फरार झाले आहेत, कुठे गायब झाले आहेत, त्याचा आधी तपास करावा”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी पुढे संजय राऊत म्हणाले, “सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्धू वैगरे लोकं आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा. ते कुठं फरार झालेले आहेत? पण सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे.
ते लाल किल्ल्यावर गेले होते. त्यांनी हडकम माजवला. आज आंदोलनात फूट पडल्याचं चित्र निर्माण करण्यात आलंय. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना बघून घेऊ, पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. अधिवेशन सुरू होत आहे, पहिल्या दिवसापासून सरकारला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, असंही संजय राऊतांनी भाजपला ठणकावून सांगितलंय.
News English Summary: Shivsena MP Sanjay Raut said, “The government has started a kind of repression. Farmers are saying that they have entered the Red Fort. Was he really a farmer? That by seducing someone, who has now been photographed, with the Prime Minister or with the BJP leaders, who are people like Sidhu. Who are they Who owns Investigate it first. Where have they escaped? But the government no longer wants to crush the farmers.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut made serious allegations on BJP over farmers tractor rally news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय