आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत | शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेक गट - संजय राऊत
मुंबई, २१ जून | ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रातील मुद्द्यावर बोट ठेवत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
राज्यात युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा तसाच आहे. ते पूर्ण तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असे सरनाईक पत्रात म्हणतात. गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा सरनाईक यांच्या मागे लागला आहे हे येथे उल्लेखनीय होय. सरनाईक यांचे ९ जून रोजीचे हे पत्र रविवारी सोशल मीडियातून व्हायरल झाले.
महाविकास आघाडी ५ वर्षांसाठीच
राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरूपी नाही. तिन्ही पक्ष यापूर्वीही स्वबळावरच लढलेले आहेत. राज्यात सध्या असलेली ही आघाडी केवळ ५ वर्षांसाठीच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी म्हटले, तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरनाईकांच्या भूमिकेचे स्वागत केले.
नाहक त्रास
भाजपशी जुळवून घेतले तर निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर यांचा व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना असल्याचे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
त्रास नेमका आहे तरी कोणता? : संजय राऊत
आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे पत्रात नमूद आहे. हा गंभीर आरोप आहे. आता या राजकारणात कोण कुणाला विनाकारण त्रास देत आहे? तो त्रास नेमका आहे कोणता? याचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
चौकशीची धास्ती
महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत असल्याचा सरनाईकांचा आरोप.
फोडाफोडीची धास्ती
शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे. सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे. पत्रात असे मुद्दे अन् त्याची अशी कारणे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया:
दरम्यान, शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्याने आता भाजपशी जुळवून घ्यावे, असं मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांना काही गंभीर आरोपही केले आहेत. दरम्यान यामुळे शिवसेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरु असल्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेनेत दोन गट आहेत का असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेक गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही”.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Shivsena MP Sanjay Raut Pratap Sarnaik Letter CM Uddhav Thackeray BJP Mahavikas Aghadi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा