15 January 2025 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

ईडीच्या नोटीसवर PMC बँक घोटाळ्याचा उल्लेख नाही | भाजपच्या माकडांना माहिती कोणी दिली

Shivsena, MP Sanjay Raut, ED Notice, Varsha Raut

मुंबई, २८ डिसेंबर: शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली.

सकाळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. ‘मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भारतीय जनता पक्षाचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले.

त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. मागील दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली जात आहेत. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्तेपासून वेगळं ठेवल्यामुळे ईडीचा वापर केला जातो आहे. एक काळ होता की ईडी, सीबीआय, सीआडी या विभागांना एक प्रतिष्ठा होती. परंतु आता केंद्रातलं सरकार ईडीचा वापर हे आमच्यावर सूड उगवण्यासाठी करत आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

News English Summary: Sanjay Raut has again attacked the Bharatiya Janata Party by holding a press conference at Shiv Sena Bhavan. For the last one and a half months, the Directorate of Recovery (ED) has been asking us for information and documents. We are giving them the information they need. The ED has not yet mentioned the PMC bank scam in its notice. Shiv Sena MP Sanjay Raut asked where the BJP’s monkeys got this information from and how they started jumping from yesterday.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut slams BJP on ED Notice to his wife Varsha Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x