22 December 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

अयोध्याला गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर शिवसेना नक्कीच मदत करेल

Shivsena MP Sanjay Raut, MNS Chief Raj Thackeray, Ayodhya Tour

पुणे, २० फेब्रुवारी: राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.

त्याला कारण ठरू शकतात आगामी महानगरपालिका निवडणूक असंच म्हणावं लागेल. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात स्पष्ट केले.

दरम्यान पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. अयोध्येत आपलं दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेलं पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.

मागील दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झालं, त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसतय” असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.

 

News English Summary: Uddhav Thackeray has been in Ayodhya for the last one and a half years. From that a new movement started, as a result of which a Ram temple is being built, ”said Sanjay Raut. After going there, if Raj Thackeray needs any help, we will definitely help, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut talked on MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x