22 December 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसानं दिला याचंच आश्चर्य - विनायक राऊत

Maratha reservation

मुंबई, ०५ जून | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.

विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिवे लावले? राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. मराठा आरक्षणाच्या समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती दिला गेला याचंच आश्चर्य वाटलं, असे चिमटे राऊत यांनी काढले.

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्हाला पंतप्रधानांनी वेळ दिला नाही. आम्ही दोन वेळा मागितली होती, पण पंतप्रधानांनी आम्हाला वेळ दिली नाही. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे श्रेय जावू नये म्हणून केंद्र सरकारला टोलवाटोलवी करायची होती. श्रेयवादाचा मुद्दा केंद्र सरकारने जाणूनबुजून उभा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा आरणक्षावर महाविकास आघाडी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

News English Summary: Shiv Sena MP Vinayak Raut has strongly criticized BJP MP Narayan Rane on the issue of Maratha reservation. Saying that everyone knows what the Narayan Rane Committee appointed for Maratha reservation gave, it is surprising that the report of Maratha reservation was given by an ignorant man, Vinayak Raut has criticized Rane in such slang words.

News English Title: Shivsena MP Vinayak Raut attacks MP Narayan Rane over Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x