26 December 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

केंद्र सरकारने ईडीचा कितीही वापर केला तरी महाविकास आघाडीला धोका नाही - खा. विनायक राऊत

Shivsena MP Vinayak Raut

रत्नागिरी, ०२ जुलै | मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. केंद्र सरकारचं हे पाऊल चुकीचं होतं, असं सांगतानाच आता केंद्र सरकारने आता आपलं अपयश झाकण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ईडी कारवाईवरून भाजपाला सुनावलं:
यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरही टीका केली. ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकारचे बाहुले आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळत नाही म्हणून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. केंद्र सरकार वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला. साखर कारखाने चालवणं मुश्किल झालं आहे. साखर कारखाने डबघाईला आले आहेत. चांगले कारखाने चालत आहेत. त्यांच्यावर ईडीकडून छापे मारले जात आहेत. ते कारखाने बुडवणे म्हणजे त्या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्यासारखं आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारने ईडीचा कितीही वापर केला तरी महाविकास आघाडीला धोका नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोपीचंद पडळकरांवरही टीका:
खासदार विनायक राऊत यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही खोचक शब्दात निशाणा साधला. पडळकर आधी राष्ट्रवादीत होते. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. त्यामुळे त्यांची वळवळ सुरू आहे. त्यांच्या बोलण्याने राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नाही, असं सांगतानाच बांडगा असतो त्याला जास्त चेव येत असतो, अशी खोचक टीका त्यांनी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Vinayak Raut criticized Central government over ED actions against MahaVikas Aghadi ministers news updates.

हॅशटॅग्स

#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x