18 January 2025 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप

Shivsena, BJP Maharashtra, Raosaheb Danave

पुणे: लोकसभेत युती केल्यानंतर आगामी विधानसभेसाठी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून आत्ताच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावरून सुरु असणाऱ्या वादामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जागा वाटपा संदर्भात केलेल्या वक्तव्याने शिवसेना नेत्यांची चिंता वाढणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यात ५०-५० फॉर्म्युला ठरलेला आहे. परंतु २०१४ ला भाजपाने जिंकलेल्या १२३ जागांपैकी एकही जागा सोडणार नाही असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केले आहे. २०१४ ला भारतीय जनता पक्षाने १२३ तर शिवसेनेनी ६३ जागा जिंकल्या होत्या.

दानवे यांच्या दाव्यानुसार युतीचे जागावाटप झाल्यास पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी एकही जागा शिवसेनेला सुटणार नाही, त्यामुळे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. २०१४ साली शहरातील आठही मतदारसंघांमध्ये भाजपचे कमळ फुलले होते. यंदा शिवसेनेचे पारंपारिक मतदारसंघ असणारे हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, खडकवासला अथवा कोथरूडची जागा मिळवण्यासाठी स्थानिक नेते आग्रही आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शहरातील सर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले, महानगरपालिका निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे, राज्याच्या राजकारणात पुणे शहर केंद्रस्थानी असल्याने भाजप आता शिवसेनेला जागा सोडणार का ? हा प्रश्न आहे. दरम्यान, या संदर्भात विचारल असता शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील म्हणत बोलणे टाळले आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x