22 December 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
x

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह नव्हे तर लोकशाही गोठवण्याचे काम निवडणूक आयोगाने केले, कपील सिब्बलांची सडकून टीका

Shivsena Party symbol

Shivsena Party Symbol | शिंदे-ठाकरेतील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. शिंदेंनी निवडणूक आयोगात पुन्हा अर्ज केल्यानंतर आयोगानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, शरद पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “हल्ली निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील, याची खात्री हल्ली देता येत नाही. जे गेले काही दिवस वाटत होतं, ते घडलं”, असं म्हणत शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका उपस्थित केलीये.

ज्येष्ठ वकील कपील सिब्बल संतापले :
यावर सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाजूने भुमीका मांडणारे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर जोरादर टीका केली आहे. ते म्हणाले कि, काल जो काही केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तो अतिशय निंदणीय आहे. एकप्रकारे निवडणूक आयोग पडद्यामागून केंद्र सरकारची सादरीकरण करत आहे. केंद्राच्या शब्दावर चालणाऱ्या निवडणूक आयोगाची मला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले.

सेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले यातूनच कित्येक रुपयांना लोकशाही गोठवण्याचे काम केले आहे. भाजपचे ताठ उचलणाऱ्या शिंदे गटाने हे कृत्य असल्याचे ते म्हणाले. धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचे आहे. भाजपचे तळी उचणाऱ्या शिंदे गटाचे नसल्याचे त्यांनी खरमरीत टीका केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Party symbol check details 09 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Party symbol(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x