5 November 2024 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

काँग्रेस-राष्ट्र्वादी या पक्षांसोबत काम कारण सोपं: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Environment Minister Aaditya Thackeray, Shivsena, Congress, NCP, Mahavikas Aghadi

संगमनेर: महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली तेव्हाचा धक्का मोठा होता की संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा? या प्रश्नावर आदित्य यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं मी कुठल्याही गोष्टीचा धक्का घेत नाही. त्यामुळं मला या दोन्ही घटनांचा धक्का बसला नाही. शिवाय, आमची मैत्री पक्की असल्यानं धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. धक्का बसलेले विधानभवनात आमच्या समोर आहेत,’ असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणाचा राग जास्त येतो, असं विचारलं असता आदित्य म्हणाले, ‘राजकारणात जे काही घडतं, तो त्याचा एक भाग असतो. त्याचा राग मनात ठेवायचा नसतो. मी सुद्धा या सगळ्याकडं त्याच दृष्टिकोनातून पाहतो.’

आदित्य ठाकरे यांना रॅपिड राउंड मध्ये विचारले गेलेले प्रश्न;

१. कोण जास्त आवडतं? अजित पवार की देवेंद्र फडणवीस- अजित पवार
२. जवळचं कोण? आई की बाबा – आईबाबा
३. भाजपमधील जवळचा नेता कोण?- पंकजा मुंडे की एकनाथ खडसे – महाविकास आघाडीसाठी दोन्ही जवळचे
४. सर्वाधिक धक्का कधी बसला? अजित पवारांनी पहाटे शपथ घेतल्यावर की संजय राऊत लीलावतीत गेल्यावर – दोन्ही नाही
५. सर्वाधिक ऐकलेलं वाक्य? आमची चर्चा सुरु आहे, चर्चा सकारात्मक होत आहे की मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि
शपथविधी शीवतीर्थावर – दोन्ही
६. कोणाचा जास्त राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे – उत्तर टाळलं

 

Web Title:  Shivsena Party thinks congress and NCP people should be easy to work says Minister Aaditya Thackeray.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x