21 April 2025 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

ज्या राज्याचे मीठ खातात त्याच राज्याची बदनामी | राजकीय वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर सेनेचं टोकास्र

Shivsena, BJP, IPS officers

मुंबई, २४ मार्च: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. काल त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला.

त्यानंतर महाराष्ट्रात ट्रान्सफर पोस्टिंगच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उद्धव सरकारला निशाण्यावर घेतले आहे. या वादानंतर आता शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनातून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून महाराष्ट्र सरकारवर पाळत ठेवत आहे, हे बेकायदेशीर आहे, असे म्हणत, विरोधी पक्षाने राज्यातील सरकार खिळखिळे करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप देखील शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे.

राज्य पोलीस दलातील सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला वगैरे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारला अंधारात ठेवून केलेल्या ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाचा अहवाल घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. म्हणजेच, महाराष्ट्राच्या प्रशासनातील हे लोक एका राजकीय पक्षाची सेवा बजावत होते. विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले आणि अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते. ज्या सरकारचे किंवा राज्याचे मीठ खातो त्याच राज्याची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे राज्यातील उठवळ विरोधी पक्षाचा हात आहे हे आता स्पष्ट झाले आहे,” असं शिवसेनेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर डांगलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून लोकसभा आणि राज्यसभेतील भारतीय जनता पक्षाचे खासदार आक्रमक झाले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे अशा पद्धतीचा गोंधळ या लोकांनी घातला. प्रश्न असा आहे की, हे सर्व लोक मूर्खांच्या नंदनवनात जणू ‘बेवडा’ मारून फिरत आहेत. परमबीर सिंग यांनी शिस्तभंग केला व स्वतःची कातडी वाचविण्यासाठी आरोपांचा धुरळा उडवला आहे हे काय या मूर्खांच्या शिरोमणींना माहीत नाही? परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत व त्याची नक्कीच चौकशी व्हावी, परंतु भाजपावाल्यांच्या प्रिय गुजरात राज्यात संजीव भट्ट व शर्मा नामक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील राज्यकर्त्यांवर केलेले आरोपही धक्कादायक आहेत. त्यावर काय कारवाई झाली? गुजरातचे तत्कालीन राज्यकर्ते हे कसे भ्रष्ट, अनैतिक कार्यात गुंतले होते व त्या कामी पोलीस दलाचा कसा गैरवापर झाला हे भट्ट यांनी सांगितले व त्या बदल्यात भट्ट यांना खोट्या आरोपांत गुंतवून तुरुंगात डांबले.

 

News English Summary: After the letter bomb of former Mumbai Police Commissioner Parambir Singh, Fadnavis gave the data of phone tapping for police transfers. Fadnavis had immediately left for Delhi after holding a press conference at the BJP office on Tuesday morning. Yesterday, he met Union Home Secretary Ajay Bhalla and handed over a closed letter and a 6.3 GB pen drive containing correspondence between the officials.

News English Title: Shivsena slams IPS officers working like politicians in Maharashtra news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या