3 November 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
x

रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे, लवकर बऱ्या व्हा; प्रियांका चतुर्वेदींचा अमृता फडणवीस यांना टोला

Shivsena spokesperson Priyanka Chaturvedi, Amruta Fadnavis

मुंबई: औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

अमृता फडणवीस यांनी औरंगाबादमधील वृक्षतोडीकडे लक्ष वेधून शिवसेनेचं वृक्ष प्रेम बेगडी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात १७ एकर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी ६४ कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. या स्मारकासाठी शासनाकडून ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या स्मारकाच्या आड एक हजार झाडं येत असल्याने ही झाडं तोडण्यात येणार असल्याची माहिती उघड झाल्याने हे ट्विटर वॉर सुरू झालं.

प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करायचं असेल तर किमान ५ हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. ६ वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उद्यान विभागाच्या कृपेनं भर उन्हात झाडं पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यामुळे अनेक झाडं वाचली.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना १ हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

तत्पूर्वीच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील नियोजित स्मारकासाठी एकही झाड तोडू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच दिले होते. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री फोनवरून चंद्रकांत खैरे, औरंगाबादचे नागपूर नंदू घोडले आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी उद्यानातील एकही झाड तोडले जाणार नाही, असे समजते.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरच्याच माध्यमातून सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे. ‘सॉरी, तुमचा अपेक्षाभंग झाला. पण एकही झाड कापलं जाणार नाही, हे सत्य आहे. महापौरांनीही याला दुजोरा दिला आहे. रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे. गेट वेल सून,’ असा टोला प्रियंका यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

 

Shivsena Spokesperson Priyanka Chaturvedi slams Amruta Fadnavis over Twit

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x