16 April 2025 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

दिल्लीत भाजपात प्रवेश घेताना हायकमांडसमोर कॉलरही उडवली नाही: शिवसेना

MP Udayanraje bhosale, Satara MP Udayanraje Bhosale, Shivsena, BJP party

मुंबई: उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील देखील उपस्थित होते. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या काळात १५ वर्षांपासूनची प्रलंबित कामे मार्गी लागली. राष्ट्रवादी पक्षात अडवा व जिरवा धोरण राबवलं गेलं. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामागे हेच कारण आहे’,अशी प्रतिक्रिया उदयनराज यांनी भारतीय जनता पक्ष प्रवेश केल्यानंतर दिली. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीत बसत नाहीत याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाचा रस्ता पकडला व भारतीय जनता पक्षात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

काय म्हटले आहे आजच्या सामनाच्या संपादकीय मध्ये?
सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षाचा मार्ग स्वीकारला आहे. आयाराम-गयारामांचा मुसळधार मोसम सध्या सुरूच आहे. पाऊस थांबत नाही तसा हा मोसमही थांबत नाही.

भारतीय जनता पक्षाने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांना प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. सातारचे राजे युती परिवारात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भारतीय जनता पक्षाविषयी भूमिका वेगळी होती व ती टोकाची होती. कोण मोदी? आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत, असा त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत बजावले होते. मोदींच्या सरकारने लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिले असा संताप त्यांनी कॉलर उडवत व्यक्त केला होता. आता त्यांनी मन बदलले आहे व मोदी-शहा हे शिवरायांच्या विचाराने कार्य करीत असल्याचे विचार मांडले आहेत.

उदयनराजे यांचे ईव्हीएम विषयीदेखील वेगळे मत होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना जेरीस आणलेच होते. एरवी तीन-चार लाखांच्या मताधिक्याने जिंकणारे राजे यावेळी ‘दम’ खात जिंकले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या