Shivshahir Babasaheb Purandare Passes Away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन
मुंबई, १५ नोव्हेंबर | पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं आहे. (Shivshahir Babasaheb Purandare passes away) वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील तीन दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे 5 वाजून 7 वाजून त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांचं एक पथक हे त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होऊन होते. मात्र, कालपासूनच ते उपचारांना साथ देत नव्हते.
Shivshahir Babasaheb Purandare Passes Away. Padma Vibhushan Shivshahir Babasaheb Purandare passed away at Dinanath Mangeshkar Hospital in Pune today (November 15). He breathed his last at the age of 100 :
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव सकाळी 8. 30 वाजता पुण्यातील (Pune) पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीस येथे अंत्यसंस्कार केले जातील.
बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित एक विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून अचानक बाबासाहेबांच्या प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, वार्धाक्यामुळे ते उपचारांना अपेक्षित असा प्रतिसाद देत नव्हते.
आपल्या ओघवत्या वाणीने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. मात्र, आज त्यांच्या निधनाने शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास हा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
आपल्या वयाची तब्बल 80 वर्ष शिवचरित्र प्रसाराचं काम करणारे बाबासाहेब पुरंदरे यांनी शेवटपर्यंत आपलं हे व्रत कायम ठेवलं. ‘राजा शिवछत्रपती’ ही त्यांची गाजलेली कांदबरी आजही सर्वाधिक खपाची कादंबरी आहे. आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष शिवचरित्राचा प्रसार करणाऱ्या बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जेव्हा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘हौस आणि प्रचंड महत्वाकांक्षा असेलला माणूस कधीही समाधानी नसतो. म्हणूनच मी आनंदी असलो तरी समाधानी नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shivshahir Babasaheb Purandare passes Away in Pune.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल