16 April 2025 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

कोरोना ग्रॅज्युएट शिक्काबाबतची आशिष शेलार यांची भीती अखेर खरी ठरली, कृषी विद्यापीठाकडून सुरुवात

Shocking stamp, promoted covid 19, agricultural university

पुणे, १४ जुलै : कोरोना ग्रॅज्युएट आम्हाला ‘कोरोना ग्रॅज्युएट’ तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असल्याच्या भावना भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे कळवल्या होत्या. “कोरोना ग्रॅज्युएट अशा नव्या बिरुदावलीने तर आम्हाला ओळखले जाणार नाही ना? एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?” अशा भावना विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचं शेलार म्हणाले होते.

“पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्याची काळजी घेणे योग्यच आहे. त्यासोबत त्यांचे शैक्षणिक आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेळीच देऊन सरकारने विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करावे, ही आमची विनंती,” असं शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत उशिरा का होईना, पण परीक्षा घेण्यात यावी असे मत कुलगुरूंकडून मांडण्यात आले होते. मात्र यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र आज दुसऱ्या बाजूला भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठांत दिसून आला. यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून असे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

कृषी विद्यापीठांचा अजब प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारायला सांगितलेले नाही. कृषी विद्यापीठांतील गुणपत्रिकेवर ‘ प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारणे हा अजब प्रकार आहे. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी माहिती विधिज्ञ असीम सरोदे यांनी दिली. याबाबत जर राज्य शासनाने योग्य पाऊल उचलेले नाही तर आपण याबाबत आवाज उठवणार आहोत, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली. मार्कशिटवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ शिक्का मारणे हा विषमता अधोरेखित करण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे ते म्हणालेत. कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर ‘ प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही आज याविषयावर उच न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. ज्यांना इच्छा असेल त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क करावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

 

News English Summary: A strange way of stamping ‘Promoted Covid-19’ on the marks of those who have not taken the exams due to Covid-19 was seen in agricultural studies. This is followed by intense resentment from students and parents.

News English Title: Shocking stamp promoted covid 19 on the mark sheet of agricultural university News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या