17 April 2025 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

अखेर श्रीपाद छिंदम १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार

नगर : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून १५ दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातूनच कायमचा हद्दपार करा या मागणीसाठी उद्या अहमदनगरमध्ये शिवप्रेमींच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असल्यामुळे खबरदारी म्हणून श्रीपाद छिंदमला १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नंतर जामिनावर बाहेर आला आहे. श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातूनच कायमचा हद्दपार करा या मागणीसाठी उद्या सकाळी अहमदनगरमध्ये शिवप्रेमींच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा असा प्रवास करणार आहे. शिवप्रेमींच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असल्यामुळे खबरदारी म्हणून श्रीपाद छिंदमला १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shripad Chindam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या