उजनी पाणीसंघर्ष शांत झाला | उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णय अखेर रद्द
मुंबई, २७ मे | उजनी पाणी प्रश्नावरून वातावरण कालपर्यंत अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या धरणाच्या पाणी वाटपावरून काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवास्थानासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या नागेश वनकळसे व महेश पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्या गोविंदबागतील निवासस्थासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी या प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्या शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन याबाबतचा पाठपुरावा केल्याचं पाहयला मिळालं होतं. त्यानंतर सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी आहे. सोलापूरच्या उजनी धरणातून इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी ५ टीएमसी पाणी मिळाणार नाही, असे आता राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आहे. सरकारने तसे स्पष्ट आदेश आज (२७ मे) दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी खरंतर उजनी धरणातून इंदापूरसाठी ५ टीएमसी पाणी देण्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, सोलापूरकर आणि जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून ह्याला विरोध झाला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला. भरणे यांनी वारंवार आश्वस्त करूनही हे प्रकरण अधिकच पेटत असल्याने अखेर शासनाने इंदापूरला ५ टीएमसी पाणी न देण्याचे आदेश पत्र काढले आहे.
जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, सोलापूरकरांचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. आज झालेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा आदेश काढला आहे. दरम्यान, सोलापूरकरांसाठी हा विजय असला तरी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का आहे.
दरम्यान. सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय सरकारने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याच हस्तक्षेपामुळेच घेतला गेला असून हे पाणी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत सोलापूरकरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी भाजपचे नेते सरकारविरोधात आक्रमक झालेच पण काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असेही चित्र पाहायला मिळाले. कारण, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी “प्राण जाए पर पानी न जाए” म्हणत आक्रमक इशारा दिला होता.
News English Summary: This is great news for Solapurkars. The state government has now announced that 5 TMC of water will not be available for the irrigation scheme of Indapur taluka from Ujani dam of Solapur. The government has given such clear orders today (May 27).
News English Title: Solapur Ujani Dam water conflict is over now the decision to take water from Ujani to Indapur canceled news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News