रेमडेसिवीर इंजेक्शन्स मुंबई महापालिकेच्या निवडणूक रणनीतीचा भाग होणार होती? | अनेक शंका बळावल्या - सविस्तर
मुंबई, १८ एप्रिल: ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक मोहित जैन, अंशुल केजरीवाल आणि शिरीष केजरीवाल यांनी ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शनच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेटी घेतली होती. तसेच अधिक पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा केली होती मात्र सदर चर्चा ही राज्य सरकारच्या मदतीची सांगून भाजप पक्षाकडे हा पुरवठा होणार होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यासाठी कंपनीच्या प्रमुख वितरकाचा संपर्क क्रमांक आणि कोणाला द्यायचं हे देखील कंपनीच्या वितरकाला आदेश देण्यात आले होते असं वृत्त आहे. देवेंद्र फडणवीसांना मुंबईत भेटणारे कंपनीचे मालक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आरोग्य मंत्र्यांना भेटले नाहीत. धक्कादायक म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राजकीय पक्षाच्या ओर्देरला मान्यता दिलीच कशी हा प्रश्न आहे.
आज ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक मोहित जैन, अंशुल केजरीवाल आणि शिरीष केजरीवाल यांनी ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शनच्या संदर्भात मा. @Dev_Fadnavis जी यांची भेटी घेतली आणि येत्या काळात जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याच्या बद्दल देखील देवेंद्र जी यांनी मार्गदर्शन केले! pic.twitter.com/R5xB7PVMXz
— Prasad Lad (@PrasadLadInd) April 13, 2021
विशेष म्हणजे काल पकडला गेलेला स्ट्रोक हा केवळ पहिला स्टॉक होता. सध्या रेमडीसीवीर इंजेक्शन मुबंईत अनेकांची गरज झाली आहे आणि त्यामुळे त्या गजरेला धरून पुढील वर्षीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यात येतं होती अशी माहिती भाजपच्या गोटातून नाव न सांगण्याच्या अटीवर मिळाली आहे. मुंबईतील भाजप आणि तसेच नगरसेवक असलेल्या मतदारसंघात याचा वापर होणार होता. शिवसेना सोबत नसल्याने भाजपाला मुंबई महानगरपालिकेत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कोरोनामुळे मुंबईतील स्थिती स्थिर होईपर्यंत वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत मुंबई शहरात भाजपबद्दल भावनिक सहानुभूती निर्माण करण्याची योजना होती आणि यासाठी गुजरातमधूनही ताकद देण्यात आल्याचं वृत्त आहे.
प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दमणला याकंपनीच्या मालकांच्या भेटीला गेले होते. त्या भेटीनंतर दमणवरून रेमडीसीवीर इंजेक्शनचा साठा आल्यानंतर तो देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल असं लाड यांनी सांगून राज्य सरकार आणि एफडीएला संभ्रमात ठेवलं असं म्हटलं जातंय. प्रति ९५० रुपये याप्रमाणे ५० हजार रेमडीसीवीरसाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च प्रदेश भाजप करेल असं सांगण्यात आलं. त्यानुसार ही डील निश्चित झाली होती. मात्र कळीचा मुद्दा हाच आहे की रेमडीसीवीर हे राजकीय पक्षांना विकण्याची मान्यताच किंवा परवानगीच नसताना भाजपच्या डोक्यावर कोणी हात ठेवला होता त्याचा अंदाज येऊ शकतो. मात्र काल पोलिसांना आणि एफडीला माहिती मिळाली आणि भाजपचे नेते योजना फसणार या भीतीपोटी थेट स्थानिक पोलीस स्थानकात पोहोचले.
महाराष्ट्रातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता, मा. @Dev_Fadnavis जी यांनी काही कंपन्यांशी चर्चा केली. त्यांचे एक पत्र घेऊन आम्ही दमण येथे ब्रूक फार्मा प्रा.लि. यांच्याशी चर्चा केली आणि महाराष्ट्राला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.@PrasadLadInd @BJP4Maharashtra pic.twitter.com/66LxsFmVVD
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 12, 2021
भाजप आणि कंपनीत सौदा ठरल्याप्रमाणे पहिला ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शनचा कोटा आला आणि त्याची माहिती प्रशासनाला मिळताच रात्री वितरकाला चौकशीसाठी बोलाविण्यात आलं. मात्र वितरकाने लगेच कंपनीच्या मालकांना आणि मालकांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांना माहिती दिली आणि एका औषधाच्या वितरकासाठी रात्री उशिरा राज्याचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नळावरच्या भांडणांप्रमाणे हुज्जत घालताना देशाने पाहिले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला असा पुरवठा करण्याची मान्यताच नाही, मग कंपनी असं धाडस थेट दिल्लीतून आशीर्वाद असल्याशिवाय करणार नाही हे उघड सत्य आहे.
दरम्यान, राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्रं असल्याची माहीती पोलिसांना नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या वितरकाला चौकशीसाठी बोलावले होते. पण, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप यापूढे सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.
यावेळी वळसे पाटलांनी म्हटले की, हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल. हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठ कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता. या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे. अशी देखील माहिती आहे की केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.” अशी देखील यावेळी गृहमंत्र्यांनी माहिती दिली.
News English Summary: There was also talk of increasing the supply, but the discussion has started in the political circles saying that the supply would be given to the BJP party, saying that it was with the help of the state government. It is learned that the company’s distributor was also ordered to give the contact number of the main distributor and to whom. The company owner who met Devendra Fadnavis in Mumbai did not meet Chief Minister Uddhav Thackeray or the Health Minister.
News English Title: State BJP politics during Maharashtra corona pandemic is serious issue news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News