23 February 2025 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून आणि RBI कडून पैसे मिळत नाहीत | रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

MLA Rohit Pawar

मुंबई, ३१ मे | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 31 मे 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे.

आज मे महिन्यातील 17 वा दिवस आहे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर डिझेलची किंमत ही प्रतिलीटर 90 रुपयांच्या पुढे गेली आहे.

दुसरीकडे, पेट्रोल दरवाढीवरून आता राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. याचत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. “राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपाच्या एका नेत्याने केली. पण २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५०% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रुपये तर राज्याचा २८.३५ रुपये कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे”, असे ट्विट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

News English Summary: Who does not get money from the Reserve Bank or by selling companies like the Center. Unlike neighboring states, the storm does not even get thousands of crores of aid. This fact needs to be understood by these leaders and pursued by the Center in the interest of the state said MLA Rohit Pawar.

News English Title: State does not get money by selling companies like the center MLA Rohit Pawar criticized on BJP leader Chandrakant Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x