23 December 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

लॉकडाऊनचं लोकांना गांभीर्य नाही | सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra lockdown

मुंबई, १५ एप्रिल: महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस म्हणजेच 1 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात काय सुरु राहील आणि काय बंद राहील, असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत. मात्र प्रतिदिन हजारो लोकं कोरोनाने मृत्युमुखी आणि लाखो लोकं कोरोनाबाधित होतं असताना देखील जनतेला गांभीर्य नसल्याचं पहिल्या दिवशी स्पष्ट झालं आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

 

News English Summary: The Chief Minister has appealed not to go out of the house without urgent work. However, in different parts of the state, there are huge crowds on the streets, grocery stores, shopping for vegetables. Therefore, the state government has decided to tighten the lockdown in the state, said Vijay Wadettiwar, Minister for Relief and Rehabilitation.

News English Title: State govt may take big decision after no response from peoples on lockdown news updates.

हॅशटॅग्स

#VijayWadettiwar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x