फडणवीस, चंद्रकांत दादांच्या नैत्रुत्वात भाजपचा दारुण पराभव | धुळे-नंदुरबार उमेदवाराच्या पुण्याईवर
पुणे, ४ डिसेंबर: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (results of 3 graduate and 2 teacher constituencies) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसलाय. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय.
पुणे आणि नागपूर पदवीधर हे भारतीय जनता पक्षाचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भारतीय जनता पक्षाकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरकडे अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. 20 व्या बाद फेरीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी 6528 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या पारड्यात 5447 मते पडली आहेत. तर शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना 5205 मते मिळाली आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
News English Summary: The results of 3 graduate and 2 teacher constituencies in the state show that the ruling Mahavikas Aghadi in the state has got the fruit of unity. On the other hand, Shiv Sena, Congress and NCP fought the elections together, which was a huge blow to the Bharatiya Janata Party. This is because the Bharatiya Janata Party has lost Aurangabad and Pune and Nagpur graduate constituencies. The Bharatiya Janata Party has suffered a major defeat in all the three constituencies of the graduates. The NCP candidate has also won in the Pune Shikshak constituency.
News English Title: State Graduate and Teachers constituency election results MahaVikas Aghadi on top News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार