15 November 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

कोरोना आपत्ती | अन्यथा....राज्य सरकारकडून पुन्हा निर्बंध लावण्याचे संकेत

State Health minister Rajesh Tope, Unlock, Lockdown, Corona Crisis

मुंबई, २३ नोव्हेंबर: कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

“बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं, ”राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील २ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईत बाहेरुन येणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. परराज्यांमधून मुंबईत लोंढे येत असतात. सध्याच्या घडीला देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती बिघडू नये, यासाठी निर्बंध लादले गेले पाहिजेत,’ असं वडेट्टीवार म्हणाले.

 

News English Summary: He cited the example of cities where the number of patients is increasing, saying that the crisis has not been averted, even though restrictions on the Corona lockout have been relaxed. He had said that he did not intend to lock up immediately. Meanwhile, state health minister Rajesh Tope has said that the state will impose restrictions again and the chief minister also wants it. He was talking to reporters in Jalna.

News English Title: State Health minister Rajesh Tope on lockdown News updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x