22 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्याल ही माफक अपेक्षा - राजेश टोपे

State health minister Rajesh Tope, Prakash Jawadekar, Vaccination

मुंबई, ९ एप्रिल: सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता. तसेच राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडाही त्यांनी सांगितला होता. यासोबतच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच योग्य प्रकारे केले जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिले जातात. त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवे. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे.’

यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेश टोपे म्हणाले होते की, ‘लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.’ तसेच आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: State Health Minister Rajesh Tope has responded strongly. Rajesh Tope had said, ‘The Maharashtra government is not politicising vaccination. On the other hand, we spend the national average of vaccine wastage in the name of Maharashtra. The rate of vaccine wastage in our state is less than half of the national average. Rajesh Tope has also said that it is a reasonable expectation that the son of Maharashtra like us will take care that the image of the state will not be tarnished.

News English Title: State health minister Rajesh Tope slams union minister Prakash Jawadekar over vaccination politics news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x