कोरोना आपत्तीत राज्यभर दौरे, आरोग्यमंत्र्यांना जेवणासाठीही वेळ अपुरा, गाडीतच अल्पोपहार घेतला
मुंबई, २७ एप्रिल | महाराष्ट्रातील कोरोना स्थिती गंभीर असून सरकार, आरोग्य यंत्रणा ही स्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या राज्याला पुन्हा फीट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच टोपेंना आपल्या बिझी शेड्यूलमधून जेवणासाठीही वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
कोरोनाच्या संकट काळात राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळताना राजेश टोपेंच्या स्वतःच्या आरोग्याची मात्र हेळसांड होते की काय, अशी शंका कोणाच्याही मनात येईल. कारण टोपेंना वेळी-अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या राजेश टोपे यांनी वेळ वाचावा यासाठी औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राजेश टोपे हे पर्याय नसल्याचंही सांगतात. त्यानंतर औरंगाबादहून ते मुंबईला विमानाने रवाना झाले. राजेश टोपे यांच्या या कर्तव्यतत्परतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं 1 ऑगस्ट 2020 रोजी दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती असल्यामुळे राजेश टोपे यांनी संयमीपणे या दु:खाला पाठीमागे सारत कोरोनाविरोधाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम सुरु केलं होतं. आपल्या आईनेच कर्म करण्याची शिकवण दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय. माझे प्रेरणास्थान शरद पवार आहेत. ते सातत्याने काम करत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकांना प्रोत्साहन देत आहेत. लोकांची भीती घालवत आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले होते.
News English Summary: The Corona situation in Maharashtra is critical and the government and the health system are trying to control it. State Health Minister Rajesh Tope is currently trying to get the state back on track. That’s why Tope doesn’t seem to have time for meals from his busy schedule. The reason for this is that a video of Rajesh Tope sitting in a car at the Aurangabad airport and having a snack has come to light.
News English Title: State health minister Rajesh Tope took his light meal in vehicle news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC